Siddhivinayak in Siddhatek – Maharahstra Today
सिद्धिविनायक (सिद्धटेक) हे अहमदनगर जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. येथील गणेश मूर्तीची स्थापना प्रत्यक्ष श्री भगवान विष्णू यांनी केली आहे. श्री सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू आहे.
अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेची ही एकमेव मूर्ती. उजव्या सोंडेच्या मूर्तीस सिद्धिविनायक असे संबोधले जाते. उजव्या सोंडेच्या गणेशाचे सोवळे फार कठिण असते. त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो.










